चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश; ॲड. संकेत साळवी यांची आरोपीच्या वतीने बाजू
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील शृंगारतळी परिसरात सुमारे २५ दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप करत फिर्यादी कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणातील काही मुख्य आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी काहींचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती आहे. Accused granted bail in Shringartali assault case
या मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी अवधूत नरेंद्र सकपाळ याला गुहागर पोलिसांनी घटना घडल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला विशेष कारागृह, रत्नागिरी येथे ठेवण्यात आले होते. संशयित आरोपी अवधूत नरेंद्र सकपाळ याच्या जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, चिपळूण येथे त्याच्या वतीने ॲड. संकेत साळवी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जास पोलीस प्रशासन तसेच फिर्यादी कुटुंबीयांकडून तीव्र हरकत घेण्यात आली होती. Accused granted bail in Shringartali assault case
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, चिपळूण यांनी संशयित आरोपी अवधूत नरेंद्र सकपाळ याची रुपये ५०,०००/- इतक्या जामीन रकमेवर मुक्तता करण्याचे आदेश पारित केले. संशयित आरोपी अवधूत नरेंद्र सकपाळ याच्या वतीने सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना ॲड. अलंकार विखारे व ॲड. पूजा माळी यांनी सहकार्य केले. Accused granted bail in Shringartali assault case