रत्नागिरी, ता. 09 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (Gogte-Joglekar College) अकौंटन्सी म्युझियम साकारण्यात येणार आहे. याकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयास नुकतीच भेट दिली. त्यानुसार हे म्युझियम तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत अकौन्टसीमध्ये होत गेलेली प्रगती प्रदर्शनाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. Accountancy Museum at Gogte-Joglekar College
सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी सीए मंदार गाडगीळ व सीए वरदराज पंडित यांची भेट घेतली. यावेळी पश्चिम विभागीय समितीचे कोषाध्यक्ष सीए केतन सैया आणि सचिव सीए सौरभ अजमेरा रत्नागिरी शाखेचे उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर उपस्थित होते. Accountancy Museum at Gogte-Joglekar College


अकौंटन्सी म्युझियममध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत अकौन्टसीमध्ये होत गेलेली प्रगती, व्यवहाराच्या बदलत्या पद्धती, विकसित होत गेलेल्या प्रणाली, जुन्या काळातील हस्तलिखिते, शिल्पे, जगभरातील संग्रहालयांमध्ये साठवलेल्या कलाकृतींची छायाचित्रे, महत्त्वाची जर्नल्स, नाणी, पदके, पहिल्या अकाउंटन्सीच्या प्रतिमा, जुने ताळेबंद आदी गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सुमेरियन, हडप्पा संस्कृतीच्या काळातील चलने, पहिले भारतीय नाणे, मोहरा, हस्तलिखित धनादेश, खातेपुस्तक, मुनीमची परंपरा आदी गोष्टींचा यात समावेश आहे. नव्या पिढीला अकौंटसीबद्दल माहिती व्हावी, गोडी लागावी व अकाउंटचा इतिहास, व्यवहाराच्या पद्धती समजून घेता याव्यात, यासाठी हे म्युझियम उपयुक्त ठरणार आहे. Accountancy Museum at Gogte-Joglekar College
देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या ‘आयसीएआय’ ही सर्वात मोठी प्रोफेशनल बॉडी असलेली जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या व सनदी लेखापालांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवोपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कॉमर्स महाविद्यालयांमध्ये त्या अकौंटन्सी म्युझियम स्थापन करण्यात येणार आहेत, असे सीए इन्स्टिट्यूट शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी सांगितले. Accountancy Museum at Gogte-Joglekar College