मयत सतेश घाणेकरच्या पत्नीची गुहागर पोलिसांकडे मागणी
गुहागर, ता. 11 : रस्त्यावरील केबलच्या मारामुळे असगोली येथे दुचाकी अपघात होऊन मृत्यू झालेल्या सतेश घाणेकरची पत्नी वैष्णवी घाणेकर यांनी सदर अपघाताला कारणीभूत असलेला वाहनचालक व केबल उभारणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुहागर पोलिस निरिक्षक यांच्याकडे केली आहे. Accidental death of Satesh
श्रीमती वैष्णवी घाणेकर यांनी दिलेल्या निवेदनात गुहागर तालुक्यातील असगोली येथील ३८ वर्षीय सतेश घाणेकर हे १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ वाजता आपला मुलगा श्रीवांश घाणेकर व जावई पांडुरंग घर्वे यांच्यासह गुहागर येथून खाजगी स्वताच्या मालकीच्या दुचाकीवरून असगोली येथील आपल्या घरी येत होते. या मार्गावर असगोली मधलीवाडी येथे समोरून एक सहाचाकी ट्रक क्रमांक एमएच ०६ एक्यू ९५०८ हा ट्रक भरगाव वेगाने गुहागरच्या दिशेने येत होता. असगोली मधलीवाडी येथे ग्रामपंचायत येथे जाणारी महानेट कंपनीची वायफायची केबल वायर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खांबावर बऱ्याच दिवसांपासून खूप खाली लोंबकळत होती. सदर लोबकळणारी वायर भरगाव येणाऱ्या ट्रकच्या वरच्या बाजुला अडकून ताणल्याने तुटली. मात्र सदर केबल दुचाकीवरून प्रवास करणारे माझे पती यांच्या दुचाकीवर आदळली. यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. Accidental death of Satesh


यामध्ये माझे पती यांचे उपचारादम्यान निधन झाले. तर ४ वर्षाचा माझा मुलगा श्रीवांश आमचे जावई पांडुरंग घर्वे हे गंभीररित्या जखमी असून अजूनही ते उपचार घेत आहे. माझ्या कुटुंबाचा आधारच हरपला असून कुटूंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे सदर अपघातास व माझे पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेले बेजबाबदार चालवीणाऱ्या सहा चाकी टॅकचा चालक व मालक, महानेट कंपनी व त्यांचे ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. Accidental death of Satesh