रत्नागिरी, ता.11 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले. Abhyankar school conducted Prabhat Feri


या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. तसेच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकामध्ये अभिवादन करण्यात आले. जोशी पाळंद, गाडीतळ, लक्ष्मी चौक, शेरे नाका, टिळक आळी आणि पुन्हा शेरे नाका, जोशी पाळंद मार्गे ही फेरी शाळेत आणण्यात आली.


विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जयजयकार, तिरंग्याचा जयजयकार अशा घोषणा दिल्या. लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे विद्यार्थ्यानी फेरी नेली. तिथे लोकमान्यांना अभिवादन केल्यानंतर फेरी पुन्हा शाळेत आली. मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेरी यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. Abhyankar school conducted Prabhat Feri

