“छावा” चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका अभिनव याने साकारली
गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने “छावा” चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका साकारणाऱ्या कु. अभिनव सचिन साळुंखे याचा मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. Abhinav Salunkhe felicitated by MNS
शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयामध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित “छावा” चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका साकारणारा कु. अभिनव साळुंखे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमिष कदम, मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, सरिता साळुंखे, श्रीपत साळुंखे, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, प्रशांत साटले, सुनील मूकनाक, राहुल जाधव यांच्यासह सर्व शिवप्रेमी उपस्थित होते. Abhinav Salunkhe felicitated by MNS


यावेळी बोलताना अभिनव साळुंखे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका मला साकारण्याचे भाग्य मिळाले. सर्वप्रथम माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने माझा सत्कार होत असून हा सत्कार मला पुढील आयुष्यात नक्कीच प्रेरणा देईल. या पुढील काळात देखील मला सर्व शिवप्रेमी तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, ही अपेक्षा व्यक्त केली. मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी तालुक्यातील सर्व शिवप्रेमींसाठी छावा चित्रपटाचे दोन शो राजलक्ष्मी चित्रमंदिर शृंगारतळी येथे विनामूल्य दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व लहान मुलांनी तसेच शिवप्रेमीनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले. शेवटी आभार तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी मानले. Abhinav Salunkhe felicitated by MNS