गुहागर, ता. 26 : तालुक्यातील जानवळे गावची सुकन्या कु. आर्या ओंकार संसारे हिला राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सत्कार करण्यात आला. शृंगारतळी येथील मनसे जनसंपर्क कार्यालय तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते आर्या हिला शाल व पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Aarya Sansare felicitated by MNS
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या जनसंपर्क कार्यालय शृंगारतळी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कु. आर्या संसारे हिचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा धनुर्विद्या संघटना TWJ द्वारा आयोजित डेरवण येथील सामन्यामध्ये जानवळे गावची सुकन्या व बालभारती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. आर्या संसारे हिने मिनी सब ज्यूनिअर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडलेल्या सब ज्यूनिअर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवले. जिल्हा व राज्यस्तरावर सुद्धा तिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. उस्मानाबाद येथे सब ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धा तसेच हिंगोली येथे व मिनी सब ज्युनिअर या दोन्ही स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. कु. आर्या हिने मिनी सब ज्युनिअर मुलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले तर सब ज्युनिअर मुलीमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त करुन रौप्य पदक मिळविले. Aarya Sansare felicitated by MNS
या कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, उद्योजक ओंकार संसारे, रुची संसारे, अंतिम संसारे, सचिन संसारे, अभिषेक संसारे, उमेश संसारे, विश्वजीत पोतदार, मानसी खातू आदी मान्यवर उपस्थित होते. Aarya Sansare felicitated by MNS