संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता १० वी सन १९२४-२५ चा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विद्यालयातील एकुण ५१ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यालयाने १००% निकालाची अनेक वर्षाची परंपरा कायम राखली आहे. Aabloli College 10th Result 100 Percent


कु. श्रेयस सतिश विचारे, कुमारी तन्वी अनिल मोरे यांनी प्रत्येकी ९८.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमारी किमया दिनेश नेटके हिने ९५.००% गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कुमारी वैष्णवी विकास मेस्त्री हिने ९४.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कुमारी श्रावणी महेश साळवी हिने ९३.४०% गुण मिळवून चौथा क्रमांक, कुमारी आर्या धनदिप साळवी हिने ९०.४०% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डि. डी. गीरी यांचेसह शाळा व्यवस्थापन कमीटी पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. Aabloli College 10th Result 100 Percent

