निलेश पावरी 8108432236
आज मासेमारीसाठी फार कठीण काळ झाला आहे. मासे मिळवण्यासाठी तुम्हाला फार दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे जाण्याच्या तसेच येण्याच्या खर्चाचा ताळमेळ पण बसत नाही. उत्पन कमी आणि खर्च फार अशी आपली अवस्था झाली आहे. A very difficult time for fishing
याबद्द्लची कारणे काय असतील याची तुम्हाला कल्पना असणारच. पण आज या गोष्टीकडे सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत. हा काळ असाच चालू राहिला तर येत्या वर्षभरात माशांचा फार तुटवडा भासू लागेल. मला वाटत तो आता वाटू लागलाय. आपण सोन्याचे अंड देणारी कोबडीच कापून खाल्ली आहे. मुळात आपण मासेमारी करीत नसून मत्स्यशेती, शेती करीत आहोत. हे आपण विसरलो आहोत. म्हणजेच शेतकरी शेती करताना जी कामे करतो. ती आपण पण केली पाहिजेत. A very difficult time for fishing
निसर्गाचे नियम लक्षात ठेवा.
- जे पेराल ते उगवेल
- जे पेराल त्या पेक्षा जास्त उगवेल .
- पण उगवण्याआधी पेरले पाहिजे.
मग ती शेती असो, मासे असो, प्रेम असो, आनंद असो वा द्वेष असो. आपण नियम विसरलो, त्याचे परिणाम आपणच भोगतोय.
शेतकरी बीज पेरून झाल्यानंतर ठराविक काळ वाट पाहतो. ते फळ येण्याची. आपण मात्र बीज वाढायला वेळच देत नाही. परदेशात किती आकाराचे मासे मारायचे नियम ठरवून दिलेत. आपण दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत आहोत. बर जेव्हढे मासे पकडतो त्यातील 80% मासे आपण फेकून टाकतो. ते बिचारे बारीक जीव वाढायला चान्सच देत नाही. शिवाय आपण अनैसर्गिक मासेमारी कडे वळलोय. ज्यादा फायदा मिळण्याच्या हव्यासापोटी समुद्र उधवस्त करीत चाललोय. A very difficult time for fishing
पण या पुढे काय करायचे. एकदा ठरवायलाच हवे. पण पुढाकार कोणी घ्यायचा, कोणीतरी तरी घेतलाच पाहिजे. अशाने संपूर्ण माच्छिमार समाजापुढे फार मोठा ऊदरनिर्वाहचा प्रश्न उभा राहील. या साठी समाज्यातील तरुणांनी एकत्र येऊन काही लोकांना नाही आवडले तरी कठोर निर्णय घ्यावे लागतील. तरच समाज काही वर्षात उभा राहील. माझ्या या लेखाशी आपण समंत असाल तर आज पासून जागरूक व्हा. A very difficult time for fishing