बॅग पद्धतीने करत आहेत फळ अवस्थेतील रोपांची विक्री
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : शेती हा ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगाराचा प्रमुख स्त्रोत तर शहरी भागातील लोकांसाठी कुतुहलाचा विषय. शहरी भागातील कित्येक नागरिक मोठ्या आवडीने थोड्या फार प्रमाणात या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढुन भाजीपाला पिकविण्याचा छंद जोपासतात. चिपळूण व आसपासच्या परिसरातील नागरिकांनाही हा छंद जोपासता यावा व या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशातून शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून एक अनोखी व नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येत आहे. A unique experiment of organic vegetable sales by students
या संकल्पनेतुन विद्यार्थी पॉलिथीन बॅगचा वापर करुन फळ अवस्थेतील भाजीपाला रोपे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देत आहेत. सोबतच हे विद्यार्थी या रोपांसोबत जिवामृत हे रोपवर्धक ग्राहकांना मोफत देवुन त्याचा वापर, रोपवाढी विषयाचे तंत्रज्ञान व माहीती थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सावर्डे परिसरातून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. A unique experiment of organic vegetable sales by students
चिपळुण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी या संकल्पनेचे कौतुक केले. आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या चतुर्थ वर्षातील सेंद्रिय शेती प्रकल्पामधील सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व प्रकल्प अधिकारी प्रा.प्रशांत पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. A unique experiment of organic vegetable sales by students