• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरीआगर जेटीच्या बांधकामाला अखेर प्रारंभ

by Ganesh Dhanawade
November 4, 2023
in Guhagar
179 2
2
Construction of Sakhriagar Jetty started
352
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

८ कोटी ४३ लाख इतका निधी, पतन विभागाकडून पाहणी

गुहागर, ता. 04 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमार जेटीचे काम अखेर सुरु झाले आहे. विशेष म्हणजे वाढीव निधी मंजूर होऊनही बांधकामासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नव्हता मात्र, आता मुंबईच्या एका कंपनीने कामाची वर्कआँर्डर स्वीकारल्याने जेटीच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. Construction of Sakhriagar Jetty started

साखरीआगर येथील मच्छिमारांना जेटी नसल्याने वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. जेटी नसल्याने होड्या नांगरणे, मासे उतरविणे शक्य होत नसल्याने परिणामी, रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये त्यांना आपल्या होड्या उभ्या करुन ठेवाव्या लागतात. त्यामुळे साखरीआगर ते जयगड हा प्रवास तसेच डिझेल वाहतूक करणे या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. येथील मच्छिमारांची ही गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी जेटीला २०१०-११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी तिच्या बांधकामाला २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. २०१२ मध्ये या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काम सुरु झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत सोडले होते. Construction of Sakhriagar Jetty started

सीआरझेडच्या विळख्यात अडकलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारी बहुतांश ठिकाणी जेटींच्या कामांना मंजुरी होऊन कामे सुरुही झाली. मात्र, साखरीआगर जेटीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडल्याने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरु केला होता. दरम्यानच्या काळात या जेटीच्या कामाचा खर्चही वाढला. या सगळ्यांसाठी त्यांनी वारंवार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठकाही घेतल्या होत्या. अखेर या कामातील अडसर ठरलेली सीआरझेडची परवानगी मिळून ८ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात जेटीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती पतन विभागाचे अभियंता निलेश पाटील यांनी दिली. Construction of Sakhriagar Jetty started

Tags: Construction of Sakhriagar Jetty startedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share141SendTweet88
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.