विद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक
गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी फेऱ्यांचा तुटवडा. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात गुहागर तालुक्यातून कौंढर काळसुर परिसरातील विद्यार्थी व गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांनी गुहागर आगाराला एसटी फेऱ्या सुरु करण्याबाबत निवेदन देण्यात आले. A statement to Guhagar Agara


गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, विविध विषयांचे कोर्सेस हे गुहागर तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी फेऱ्यांचा तुटवडा. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात गुहागर तालुक्यातून कौंढर काळसुर परिसरातील विद्यार्थी व गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुहागर आगाराला धडक दिली. आगार व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बस फेऱ्या नियमितपणे सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. A statement to Guhagar Agara


यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, विक्रम जोयशी, किशोर बामणे, तेजस पोपळे, सागर शिरगावकर, विवेक शिर्के, प्रसाद विखारे व कौंढर काळसुर गावचे विद्यार्थी उपस्थित होते. A statement to Guhagar Agara

