पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी
गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी 7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनासह विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेदवीत अपघातग्रस्तांची भेट घेतली. A private bus hit Dili ST in Pimper

दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने सध्या गुहागर तालुक्यामध्ये चाकरमानी येत आहेत. उमराठ घाडेवाडी आणि मराठवाडीतील चाकरमान्यांनीगावी येण्यासाठी बोरिवली आगारातून एस.टी. आरक्षित केली होती. रविवारी सायंकाळी जत डेपोची एसटी (एमएच11बीएल 9378) नालासोपारा डेपोतून सुटली. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, बांद्रा कलानगर, जोगेश्र्वरी, सांताक्रुझ येथून 6 लहान मुलांसह 42 गणेशभक्तांना घेवून ही एस.टी. गुहागरकडे येण्यास निघाली. मार्गताम्हान्यातून बोऱ्या जामसुद मार्गे उमराठकडे ही बस चालली होती. सोमवारी सकाळी 7.15 वा. जामसूद पिंपरच्या सीमेवर एस.टी. आली. त्याचवेळी अरुंद रस्त्यावरुन भरधाव वेगाने मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने (क्र. एमएच04 जेयू 8280) एस.टी.ला धडक दिली. धडक दिल्यानंतर खासगी बसच्या चालकाने अपघातस्थळावरुन गाडीसह पोबारा केला. A private bus hit Dili ST in Pimper

या धडकेमुळे उमराठमधील अन्वी भरत घाडे (वय 3.5), प्रेम भरत घाडे (9), समिका संतोष घाडे (12) या तीन मुलांसह भरत अर्जुन घाडे (40), प्रकाश पांडुरंग घाडे (42), निता नंदकुमार आग्रे (32), आनंदा धाकु बसणकर (42), अंकिता एकनाथ घाडे (45), महेंद्र महादेव आग्रे (36), संदिप संजिवन पवार (43), सोनल कृष्णा घाडे (27), किशोरी कृष्णा कुळ्ये (29), ज्योती प्रकाश घाडे (35) प्रिया भरत घाडे (30) प्रमिला कृष्णा घाडे (55), धीरज राजाराम घाडे (30) जखमी झाले. या सर्वांना तातडीने हेदवीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.तेथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत कदम आणि त्यांच्या टीमने उपचार केले. यामधील निता आग्रे, संदिप पवार, आनंदा बसणकर या प्रवाशांना ओठात दात घुसून मोठी जखम झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेने हलविण्यात आले आहे. A private bus hit Dili ST in Pimper

अपघाताचे वृत्त कळताच गुहागर आगराचे व्यवस्थापक वैभव कांबळे, कर्मचारी संदिप वैद्य, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, माजी जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, वेळणेश्र्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून जखमींची चौकशी केली. A private bus hit Dili ST in Pimper
एसटीची तातडीची मदत या अपघातानंतर गुहागर एस.टी. आगाराचे व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी चर्चा करुन तातडीने प्रत्येक जखमी गणेशभक्ताला 500 रुपयांची तत्काळ मदत केली. एस.टी.च्या या निर्णयाबद्दल उमराठमधील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. A private bus hit Dili ST in Pimper
पोलीसांनी शोधले मालकाला एस.टी.ला धडक देवून पोबारा केलेल्या वाहनाचा फोटो एस.टी. वाहक आणि काही प्रवाशांनी काढला होता. त्यावरुन गुहागर पोलीसांनी खासगी बसच्या मालकाचा शोध घेतला आहे. सदर मालकाला अपघातग्रस्त बससह सायंकाळपर्यंत गुहागर पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे. A private bus hit Dili ST in Pimper

नेत्राताईंनी केली मदत
3 जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय झाल्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या माजी जी.प.सदस्या सौ. नेत्राताई ठाकूर यांनी सुत्रे हलविली. रुग्णालयातील अधिकारी त्याप्रमाणे रत्नागिरीमधील काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यांच्यावर लगेचच उपचार सुरु होतील याची व्यवस्था केली. A private bus hit Dili ST in Pimper
