रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील आरोग्य मंदिर येथे माघीनिमित्त बसविलेल्या महागणपतीचे परदेशी नागरिकाने दर्शन घेतले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरीकरांनी या उत्सवाचे स्वागत केले आहे. दरम्यान, आज (७ फेब्रुवारी) सायंकाळी ४ ते १० यावेळेत श्रींची आरोग्य मंदिर येथून भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. A foreigner had darshan of Ganesha


परदेशी नागरिकांना नेहमीच भारतीय सणांचे, उत्सवांचे आकर्षण राहिले आहे. इटलीहून भारतात आणि रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेला हा परदेशी पाहुणा सायंकाळच्या सुमारास आरोग्य मंदिर परिसरात फिरत होता. त्याच वेळी महागणपती त्याच्या दृष्टिक्षेपात आला आणि त्याची पावले आपोआप मंडळाच्या दिशेने वळली. सर्वांबरोवरच या परदेशी पाहुण्यानेही रांगेत उभे राहत महागणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, मंडपात असलेल्या मंडळाच्या पदाधिऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मंडळाच्या वतीने या परदेशी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. तसेच भेट म्हणून श्रीफळ आणि गणपतीची प्रतिमा देण्यात आली. यावेळी त्या परदेशी पाहुण्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. A foreigner had darshan of Ganesha
यावेळी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, सल्लागार मनोज घडशी, सदस्य राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रामदास शेलटकर, राजेश झगडे, अमृत गोरे, साईनाथ सावंत, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, शिवाजी कारेकर, प्रणव सुर्वे, श्रीनाथ सावंत, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर, सौ. अश्विनी देसाई आदी उपस्थित होते. A foreigner had darshan of Ganesha