• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पाटपन्हाळे येथे डंपर पेटला

by Ganesh Dhanawade
January 7, 2023
in Guhagar
246 3
0
A dumper caught fire at Patpanhale
484
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील के एल पी पी एल च्या एलएनजीटीच्या संरक्षणार्थ समुद्रामध्ये ब्रेक वॉटर उभारण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपरने मध्यरात्री बारा वाजता पेट घेतल्याची घटना घडली. सदरील घटना गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटपन्हाळे येथे घडली आहे. A dumper caught fire at Patpanhale

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून सुमारे सात लाख टन काळा दगडाची खान सुरू आहे. रात्रंदिवस या ठिकाणाहून पाटपन्हाळे ते अंजनवेल असा 22 किलोमीटरचा मोठमोठे दगड वाहतूक करणारे डंपर भडगाव वेगाने जात आहेत. या अगोदर जास्तीत जास्त फेऱ्या मारण्याच्या नादामध्ये गुहागर वेलदूर मार्गावर असाच डबर वाहतूक करणारा डंपर पलटी होऊन मोठा अपघात घडला होता. त्याचप्रमाणे गुरुवारी मध्यरात्री पाटपन्हाळे येथून डबर ची वाहतूक करणारा एपीएस कंपनीचा डंपर पाटपन्हाळे येथे आला असता डंपर ने अचानक पेट घेतला. या वेळी डंपरच्या पाठून आलेल्या वाहनाने डंपर चालकाला सावधान केल्याने मोठा अनर्थ टळला. A dumper caught fire at Patpanhale

यावेळी पाटपन्हाळे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने डंपरला लागलेली आग विझवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अशा प्रकारचे क्षमतेपेक्षा जास्त दगड वाहतूक करणाऱ्या या डंपर मुळे यापुढेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासन लक्ष देईल का? अशी मागणी तालुक्यातील वाहनचालक व सर्वसामान्य जनता करत आहे. A dumper caught fire at Patpanhale

Tags: A dumper caught fire at PatpanhaleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.