डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचा स्तुतत्त्य उपक्रम
गुहागर, ता. 12 : संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर आधारित असते. या सैनिकांच्या देशनिष्ठेमुळेच देशातील प्रत्येक नागरिक हा मुक्तपणे श्वास घेत असतो. सैनिकांच्या या देश प्रेमासाठी एक कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना रक्षाबंधन या सणानिमित्त राख्या पाठवणे व त्यांच्याप्रति आदर व्यक्त करणारी पत्रं लिहिणे यासारखे स्तुतत्य उपक्रम महाविद्यालयमध्ये आयोजित करण्यात आला. A commendable activity of Tatyasaheb Natu College

त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत राखी प्रशिक्षण कार्यशाळा व सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी देशभक्तीपर विचारांची पत्र पाठवण्याचा उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेत वसंतराव भागवत विद्यालयाचे कला शिक्षक श्री सुशीलकुमार कुंभार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. A commendable activity of Tatyasaheb Natu College
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्राजक्ता शिंदे यांनी केले तर आभार प्रा अन्वी निकम यांनी मानले. या अनोख्या उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरांमधून मुलांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्त्य उपक्रमाबाबत मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता काटकर, आय .क्यू. एस. सी .समन्वयक डॉ.सुरेश सुतार, डॉ. प्राजक्ता शिंदे डॉ. सत्येंद्र राजे, सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. A commendable activity of Tatyasaheb Natu College
