• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना

by Mayuresh Patnakar
July 3, 2022
in Guhagar
19 0
2
Organic Producers Company in Guhagar
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कंपनीचे शेतकऱ्यांना भागीदार होण्याचे आवाहन

गुहागर, ता. 03 : कृषी दिनाच्या औचित्याने शृंगारतळी येथे गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी 100 रु. मुल्याचे 10 भाग घेवून कंपनीचे भागीदार व्हावे, असे आवाहन केले आहे. Organic Producers Company in Guhagar

केंद्र सरकारने नाबार्ड अंतर्गत देशात 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे. या संस्थेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांद्वारा जितके भागभांडवल जमा होईल तितकेच भागभांडवल केंद्र सरकार देणार आहे. गुणवत्तापूर्वक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.  औषधे, खते, कृषी अवजारे यांची उपलब्धता करुन देणे. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार करणे. शेतीचे यांत्रिकीकरण करणे. शेतकरी उत्पादित करत असलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणे. शेतमाल खरेदी करणे. यामधुन शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. ही उद्दीष्टे ठेवून कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. Organic Producers Company in Guhagar

Organic Producers Company in Guhagar

या कंपनीच्या संचालक पदी अनंत शांताराम जोयशी (कौंढर काळसूर), विश्र्वास विनायक भिडे (कौंढर काळसूर), सौ. आरती भालचंद्र जोशी (कौंढर काळसूर), हेमंत वासुदेव गुरव (शीर), संतोष भिवाजी खेतले (कुटगिरी), मंगेश सिताराम खेतले (कुटगिरी), घनश्याम सखाराम मांजरेकर (कौंढर काळसूर), अविनाश रमेश माने (खामशेत), महेश मुकुंद काटदरे (शीर) आणि तुकाराम रामचंद्र तेलगडे (पाटपन्हाळे)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंदार जोशी काम पहाणार आहेत.

Organic Producers Company in Guhagar

शृंगारतळी बाजारपेठेतील पोस्टाजवळ या कंपनीचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कंपनीचे आणि कार्यालयाचे उद्‌घाटन नाबार्ड रत्नागिरीचे जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी आणि गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, मंडळ कृषी अधिकारी रोहीत चोथे, भीमाशंकर कोळी, भक्ती यादव, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे गुहागर क्षेत्रीय अधिकारी तेजस कदम उपस्थित होते. Organic Producers Company in Guhagar

Organic Producers Company in Guhagar

काजू व नाचणी खरेदी करणार
गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने  यावर्षी काजू आणि नाचणी हा शेतमाल खरेदी करण्याचे धोरण निश्चित केले आहे. याशिवायच्या शेतीमालाला थेट ग्राहक मिळवून देण्याचे काम कंपनी करणार आहे. Organic Producers Company in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganic Producers Company in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.