समिर घाणेकर : वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी
गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा पाहून पर्यटक नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीने जेसीबीने कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. Due to the floods and heavy rains in the rivers, garbage has accumulated on many beaches in the district along with Guhagar. Tourists resent seeing this garbage. Therefore, Guhagar Nagar Panchayat has started collecting garbage through JCB. (Beach Garbage Collection)
यावर्षी गुहागर तालुक्यात तीन वेळा महापुर आले. कोकणात अतिपाऊस झाला. परिणामी कोकणातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर प्लास्टीक व काचेच्या बाटल्या, काठ्याकुठ्या, अन्य साहित्य, ऑईल यांचा कचरा जमा झाला आहे. गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात साडेपाच किलोमिटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. भाद्रपद गणेशोत्सवात विसर्जनासाठी जनता समुद्रावर येते. म्हणून नगरपंचायतीने जेसीबी लावून त्यावेळी विसर्जन मार्गावरील कचरा दूर केला. मात्र त्यानंतर पुन्हा कचरा साठला. दिवाळीआधी पर्यटन हंगाम सुरु झाल्यावर पुन्हा एकदा कचरा दूर करण्याचे काम नगरपंचायतीने सुरु केले. मात्र त्याकाळात कडकडीत उन पडल्याने जेसीबी वाळूत रुतल्याने काम थांबविण्यात आले.
गेले तीन दिवस पाऊस पडल्याने आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती प्रसाद बोले आणि समीर घाणेकर यांनी या विषयात पुढाकार घेवून जेसीबीने कचरा बाजुला करण्यास सुरवात केली. आज (ता. 20) नगरपंचायतीने वरचापाट समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. परंतू जेसीबीने कचरा बाजुला करण्याच्या कामाला गती मिळत नाही. आजही जेसीबी वाळूत रुततो. सकाळच्या सत्रामधील 4 तासात जेसीबीने केवळ 150 ते 200 मिटर परिसरातील कचरा बाजुला करता आला. हे काम पूर्ण झाल्यावर जागोजागी कचऱ्याचे तयार होणारे ढीग उचलण्यासाठी पुन्हा स्वतंत्र यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे.
याबाबत बोलताना समिर घाणेकर म्हणाले की, जेसीबी वाळूत रुतत असल्याने अपेक्षित काम होत नाही. साडेपाच कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर मनुष्यबळ लावून कचरा उचलणे देखील व्यवहार्य नाही. यामध्ये नगरपंचायतीचा भरपूर निधी खर्च पडणार आहे. शिवाय संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. गुहागर नगरपंचायतीला समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रप्रणालीची आवश्यकता आहे. मात्र जवळपास अशी यंत्रसामुग्री सहज उपलब्ध नसल्याने संपूर्ण किनारपट्टीवरील कचरा कसा गोळा करायचा असा प्रश्र्न नगरपंचायतीसमोर आहे.आज गुहागरप्रमाणेच आंजर्ला, केळशी, मुरुड आदी पर्यटक येणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवरही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे योग्य ठरेल. मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर सहज चालणारी स्वच्छता वाहने उपलब्ध आहेत. अशी वाहने काही कालावधी करीता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात आणता आली. तर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले किनारे कमी वेळेत आणि कमी खर्चात स्वच्छ करता येतील.
Guhagar Nagar Panchayat needs modern machinery for beach cleaning. However, as such machinery is not readily available. Like Guhagar, Anjarla, Kelshi, Murud and other tourist beaches are also littered with garbage. Therefore, if the District Government administration brings this modern machinery for beach cleaning from Mumbai, the beaches that are important for tourism can be cleaned in less time and at less cost. This opinion was expressed by corporator Sameer Ghanekar.