• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बालगंधर्व नाट्यगृहात कोकणातील महिलांचे पहिले नमन

by Mayuresh Patnakar
November 25, 2026
in Guhagar
26 0
0
The first bow of women from Konkan
51
SHARES
146
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या मंडळामार्फत माऊली महिला नमन मंडळाची स्थापना करून महिला कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. या नमन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे मुबंईतील शिवाजी मंदिर दादर येथे प्रयोग केला आहे. नुकताच या नमनाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोगही साजरा झाला. आता ५२ वा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सोमवार दि ७/१२/२०२६ रोजी रात्रौ ९:३० वाजता होत आहे. या नमनामध्ये नमनसम्राट यशवंत वाकडे यांनी लिहिलेला पौराणिक गण व नटखट गौळण, रावणनृत्य असे विविध कला प्रकार सादर होणार आहेत. The first bow of women from Konkan

यामध्ये निर्माता साईनाथ नागवेकर, विशेष सहाय्य शरद गोळपकर, दादा वाडेकर, वासुदेव वाघे, सागर मायंगडे, महिला अध्यक्षा प्रेरणा विलणकर, नेपथ्य संतोष उर्फ बावा आग्रे व संगीतसाथ परशुराम घवाळी, साई घवाळी, पार्तेज आंबेरकर करत आहेत. गायिका आकांक्षा वायंगणकर, असून पूनम गोळपकर, वेदा शेट्ये, रेश्मा शिदे, विनया काळप, तन्वी नागवेकर, समिक्षा वालम, रिमा देसाई, ज्योती कदम, शिवानी मयेकर, पूर्वा चव्हाण, आदिती पवार, निरजा जोगळे, बाल कलाकार कियारा नागवेकर आदी कलाकार आपल्या भूमिका साकारत आहेत. यासाठी तिकीट विक्री बालगंधर्व रंगमदिर पुणे येथे चालू आहे. या प्रयोगासाठी या महिलांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन मंडळाचे सचिव वासुदेव वाघे यांनी केले आहे. The first bow of women from Konkan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe first bow of women from Konkanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.