• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 November 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये सायबर फसवणूक

by Mayuresh Patnakar
November 10, 2026
in Guhagar
135 1
1
Cyber fraud in Guhagar
265
SHARES
756
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अटकेची भीती दाखवून ६८ वर्षीय वृद्धाला लुटले

गुहागर, ता. 10 : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे सायबर भामट्यांचे प्रकार सुरूच आहेत. गुहागर शहरातील कीर्तनवाडी कालवा रोड परिसरात राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाची अशाच प्रकारे १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बनावट चौकशी, अटकेची भीती आणि पैशांच्या व्यवहारांचे आमिष दाखवून आरोपींनी वृद्धाला मानसिक दबावाखाली आणत त्यांच्याकडून रक्कम उकळली. Cyber ​​fraud in Guhagar

विजय सहदेव गडदे (६८, निवृत्त माझगाव डॉक, सध्या रा. मुलुंड) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप दिवान आणि सदाकत खान यांच्याविरोधात ७ नोव्हेंबर रोजी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Cyber ​​fraud in Guhagar

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या विजय गडदे यांना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप कॉल आला. फोन करणाऱ्या सदाकत खान याने आपण बंगळूर येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. गडदे यांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड शाखेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक दावा त्याने केला. या व्यवहारातील दहा टक्के म्हणजेच ३० लाख रुपये गडदे यांना मिळाल्याचेही सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी संदीप दिवान याच्या माध्यमातून गडदे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची कथित प्रत पाठवली. काही वेळाने ती प्रत हटवण्यात आली. चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी करत, रक्कम जमा न केल्यास अटक होईल, अशी भीती दाखवण्यात आली. या प्रकारामुळे गडदे मानसिक दबावाखाली आले. Cyber ​​fraud in Guhagar

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथे असतानाही आरोपींकडून त्यांना वारंवार फोन करण्यात आले. चौकशीसाठी २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून बँक खात्याचा तपशील देण्यात आला. आरोपींच्या सांगण्यावरून गडदे यांनी एसबीआयच्या धनादेशाद्वारे मुलुंड येथील एसबीआय शाखेत १५ लाख रुपये जमा केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय गडदे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. Cyber ​​fraud in Guhagar

या आधी चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच गुहागरमध्ये पुन्हा एका वृद्धाला १५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. Cyber ​​fraud in Guhagar

Tags: Cyber fraud in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet66
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.