बँक खात्यांचा गैरवापर उघड; खेड व दापोलीत गुन्हे दाखल
रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून खेड आणि दापोली पोलीस ठाण्यांत अशा प्रकारचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी बँक खात्यांचा वापर करून विविध राज्यांतील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप असून पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत. Cyber fraud cases in Ratnagiri
खेड पोलीस ठाण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) दोन खात्यांद्वारे विविध राज्यांतील नागरिकांची एकूण ८१ हजार ४२० रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या प्रकरणात रायगड व मुंबई येथील तीन तक्रारदारांकडून २० हजार ५०० रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील चार तक्रारदारांकडून ६० हजार ९२० रुपये स्वीकारून सायबर फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Cyber fraud cases in Ratnagiri
दरम्यान, दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा वापर देशभरातील सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी व पुढील खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. Cyber fraud cases in Ratnagiri
तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी संगनमताने बँक खाती उघडून किंवा त्यांचा गैरवापर करून सायबर फसवणूक केल्याचा आरोप आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, सखोल तपास करून पीडितांची रक्कम परत मिळवून देण्याबरोबरच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दापोलीतील आणखी एका संशयित सायबर फसवणूक प्रकरणाचाही तपास सुरू असून त्याचाही लवकर उलगडा व्हावा, अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. Cyber fraud cases in Ratnagiri
