गुहागर, ता. 07 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायत विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी आणला असून याची भूमिपूजन त्यांच्या हस्ते दिनांक 8 रोजी करण्यात येणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar
सकाळी १०.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छ. शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. गुहागर नाका येथे आमदार भास्कर जाधव यांचे स्वागत केले जाणार आहे. या यानंतर खालचापाट वरातीदेवी मंदिर रस्ता संरक्षक भिंत भूमिपूजन आणि ३ गणपतींचे दर्शन,. गुहागर लक्ष्मी नारायण मंदिर येथील विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. जीवन शिक्षण शाळा येथील बांधाला बांधी घालणे, शौचालय बांधणे आणि रोड बांधणे या तीन कामांचे भूमिपूजन आमदार जाधव यांच्या हस्ते होणार आहे. किर्तनवाडी सार्वजनिक विहीर ते जनार्दन भागडे घरापर्यंतच्या पाखाडीचे कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar
त्यानंतर किर्तनवाडी सेवा मंदिर चव्हाटा सुशोभिकरण, दुपारी कुंभारवाडी पाखाडी ते गजानन साळवी पाखाडीला चेकर स्टाईल बसविणे, कुंभारवाडी साळवी घर ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड पाखाडी कॉंक्रिटीकरण, मनोज बोले घराजवळील पाखाडी, कुलस्वामीनी चौक येथील रस्त्याला बांधी घालणे, देवपाट रामेश्वर स्मशान भूमि रस्ता आणि स्वयंभू महागणपती मंदिर ते शिंगवण घर रस्ता डांबरीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते होणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar
