• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 September 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात वीज ग्राहकांसाठी “सेवा सेतू” व “सेवा संकल्प” अभियानाला प्रारंभ

by Mayuresh Patnakar
September 24, 2026
in Maharashtra
30 1
0
"Seva Setu" and "Seva Sankalp" campaign
60
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महीना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरज मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना

गुहागर, ता. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास 25 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरण कडून विशेष सेवा कक्ष उभारण्यात आला असून 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत ” सेवा सेतू ” आणि “सेवा संकल्प” अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर मध्ये गुहागर आगार येथे आजपासून महावितरणने या संकल्प अभियानाला उत्साहात प्रारंभ केला आहे. या अभियानामुळे महिना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्या घर मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना अधिक लाभदायक ठरणार आहे. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign

या अभियानाला गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, तळवळीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस, गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेट्ये, शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनवणे, गुहागरच्या सहाय्यक अभियंता सौ.काजल नायक, गुहागरचे आगर प्रमुख स्वप्निल शिंदे, विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे, सावर्डेचे(सोलर)  इंडोवेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मंदार शेंबेकर, आबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम, गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर आदि. मान्यवरांच्या उपस्थितीत  ” सेवा सेतू “आणि “सेवा संकल्प” अभियानाला प्रारंभ करण्यात आला. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign

यावेळी विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी  मौलिक मार्गदर्शन करताना या अभियानाचा गुहागर तालुक्यातील 122 गावांना लाभ होईल. या अभियानाला आमचा कायम पाठिंबा राहील असे सांगून  सर्वांचे आभार मानले. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign

Tags: "Seva Setu" and "Seva Sankalp" campaignGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.