गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पिंपर येथून नालासोपारा येथे चाकरमान्यांना घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ST bus hit by a truck
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपर येथून प्रवाशांना घेऊन नालासोपाराच्या दिशेने ही बस जात होती. काजळी परिसरात बस मार्गावरून पुढे जात असताना मागून आलेल्या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकची बसला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी चर्चा होती. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अपघातामुळे गुहागर–चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना काही काळ तत्काळत बसावे लागले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. ST bus hit by a truck
