• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जयगड खाडीवर उभा राहतोय भव्य सागरी पूल

by Mayuresh Patnakar
September 4, 2026
in Ratnagiri
76 1
0
Marine bridge over Jaigad Creek
149
SHARES
426
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार नवी गती

गुहागर, ता. 04 : कोकणवासीयांना आणि पर्यटकांना कोकणच्या समुद्रकिनारी भागात प्रवास करताना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध खाड्यांवर सागरी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जयगड खाडीवरील गुहागर तालुक्यातील तवसाळ आणि रत्नागिरी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तब्बल ७१५ कोटी रुपये खर्च करून हा भव्य केबल-स्टेड पूल उभारला जात आहे. Marine bridge over Jaigad Creek

Marine bridge over Jaigad Creek

सुमारे २.९ किलोमीटर लांबीचा हा पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी आणि गुहागर या भागांतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठी सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जयगड खाडीचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य पर्यटकांना पुलावरून अनुभवता येणार आहे. या भव्य प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Marine bridge over Jaigad Creek

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarine bridge over Jaigad CreekNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.