• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओडीएफ प्लस’मध्ये चिपळूण, गुहागरची बाजी

by Mayuresh Patnakar
August 29, 2026
in Ratnagiri
20 0
0
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूणमधील १६५, गुहागरातील ११९, लांज्यातील ११६ गावे

गुहागर, ता. 29 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२. अंतर्गत १८ ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी नोंदविली आहे. शासनाच्या या मोहिमेत चिपळूण, गुहागर आणि लांजा या तीन तालुक्यांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करत बाजी मारली आहे. Chiplun, Guhagar win in ODF Plus

जिल्ह्यातील १५३३ महसुली गावांपैकी तब्बल १५२० गावे आता ‘ओडीएफ प्लस’ (हगणदारीमुक्त अधिक) म्हणून ऑनलाईन घोषित झाली आहेत. जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत असून, आता अवघी १३ गावे ‘ओडीएफ प्लस’ होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. चिपळूणमधील सर्व १६५, गुहागरातील ११९  आणि लांज्यातील ११६ गावे पूर्णपणे ओडीएफ प्लस झाली आहेत. Chiplun, Guhagar win in ODF Plus

स्वच्छतेच्या दर्जानुसार गावांचे वर्गीकरण ‘अस्पायरिंग’, ‘रायझिंग’ आणि ‘मॉडेल’ अशा श्रेणींमध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्यात २३४ गावे ‘अस्पायरिंग’, एक गाव ‘रायझिंग’ तर तब्बल १२८५ गावे सर्वोच्च अशा ‘मॉडेल’ श्रेणीत ऑनलाईन दाखल झाली आहेत. उर्वरित २४८ गावांना ‘मॉडेल’ श्रेणीमध्ये आणण्यासाठी सध्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासोबतच परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम मोलाची ठरत आहे. शिल्लक राहिलेली १३ गावेही लवकरच ओडीएफ प्लसचा टप्पा गाठतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. Chiplun, Guhagar win in ODF Plus

Tags: ChiplunGuhagarGuhagar NewsGuhagar win in ODF PlusLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.