रत्नागिरी, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा स्वतंत्र पदभार मनीषा ज्ञानू कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कदम यानी नुकताच पदभार स्वीकारला आहे. अस्मिता शिरभाते या निवृत्त झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार किरण लोहार यांच्याकडे होता. त्यानंतर कदम यांच्याकडे या विभागाचा स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला. Primary Education Officer Manisha Kadam
शासनाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत सुधारित वेळापत्रकानुसार १३ परिविक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत मूलतः सांगली जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या मनीषा कदम यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. तासिलदार यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश पुणे स्थित शिक्षण आयुक्त यांना दिले आहेत. Primary Education Officer Manisha Kadam
कदम या १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या ३० आठवड्यांच्या कालावधीसाठी रत्नागिरीत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पूर्ण कार्यभार सांभाळणार आहेत. प्रशिक्षणाच्या या ३० आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणणे आणि शाळांच्या विविध समस्या सोडवण्यावर नवन नियुक्त शिक्षणाधिकाऱ्यांचा भर असणार आहे. या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजाला नवीन प्रशासकीय गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Primary Education Officer Manisha Kadam
