गुहागर, ता. 24 : जम्मु जवळील सुचितगड सीमेवर जाऊन गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी सीमेवरील वीर सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांनी तुम्ही लक्षात ठेऊन आठवणीने आमच्यासाठी राखी आणि प्रेम आणले यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला सांगितले. तुम्ही आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत आहात. त्यामुळेच आम्ही सगळेजण सुखाने आपापल्या घरात झोपू शकतो असे या महिलांनी सांगितले. Women celebrated Raksha Bandhan with soldiers

भारताच्या सीमेवरील पूछ जिल्ह्यातील बुढा अमरनाथ बाबा चट्टानी यांची यात्रा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नेतृत्वात सुरू आहे. या यात्रेसाठी गुहागर आणि दापोली तालुक्यातील 18 जण गेले होते. परतीच्या प्रवासात जम्मू जवळील सुचित गड या सीमेवर जाऊन या सगळ्यांनी पाकिस्तानची सीमा बघितली. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय सैनिकांजवळ संवाद साधला आणि त्यावेळी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. Women celebrated Raksha Bandhan with soldiers

यामध्ये सौ आसावरी भावे, सौ अनुष्का आठवले, सौ स्वरदा भिडे, सौ गौरी भिडे, सौ स्वाती महाडिक, सौ दिपाली साठे, सौ अद्विता परांजपे, सौ रंजना गिरी, सौ मीरा जोशी, दिपाली गिरी, आर्या भावे अशा महिला आणि श्री अनिरुद्ध भावे, दीपक साठे, चंद्रकांत महाडिक, उमेश आठवले, मंगेश जोशी, मनीष साखरकर असे सहा पुरुष कार्यकर्ते एकूण 18 जण या यात्रेत सहभागी झाले होते. Women celebrated Raksha Bandhan with soldiers

