• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लेकीने मगरीच्या जबड्यातून आईला वाचवलं!

by Mayuresh Patnakar
August 21, 2026
in Old News
114 1
0
Daughter saves mother from crocodile's jaws
224
SHARES
641
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण वाशिष्ठी नदीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ

गुहागर, ता. 21: चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घराच्या मागे असलेल्या वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या मगरीने जीवघेणा हल्ला केला. पण या मृत्यूच्या दाढेतून तिला तिच्याच 10 वर्षाच्या चिमुकल्या मुलीने वाचवलं. Daughter saves mother from crocodile’s jaws

नंदिनी भुपेंद्र पवार (वय 35, रा. वालोपे गणेशवाडी) या सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली 10 वर्षांची मुलगी स्वर्णी हिच्यासोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतानाच पाण्यात दबा धरून बसलेल्या अजस्त्र मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात मगरीने नंदिनी यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नंदिनी घाबरून गेल्या आणि जीवाच्या आकांताने किंचाळू लागल्या. मगर पाण्यात ओढत असताना त्यांनी प्रसंगावधान राखत एका हाताने काठावरील मोठ्या दगडाला घट्ट पकडून धरले. आईला मगरीने ओढल्याचे पाहताच 10 वर्षाची स्वर्णी घाबरली नाही. ती थेट आईच्या मदतीला धावून आली. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि आपल्या इवल्याशा हातांनी सर्व शक्तीनिशी पाण्याबाहेर खेचले. लेकीच्या या धाडसामुळेच नंदिनी यांचा जीव वाचला. या थरारानंतर जखमी नंदिनी यांना तातडीने कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Daughter saves mother from crocodile’s jaws

ही माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी वनपाल एस.एस. सावंत, वनरक्षक के.डी. इरमले (कोळकेवाडी), वनरक्षक रा.भा. गुंटे (रामपूर), लिपिक एस.ए. कलावंत आणि आर.आर.टी. मेंबर अथर्व घाग यांच्यासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वन अधिकाऱ्यांनी जखमी नंदिनी पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि “घाबरू नका, वनविभाग तुमच्या पाठीशी आहे” असा धीर दिला. Daughter saves mother from crocodile’s jaws

दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. ”सध्या पावसाळ्यामुळे वाशिष्ठी नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे. त्यामुळे कोणीही पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा जनावरे धुण्यासाठी नदीवर जाऊ नये. तसेच लहान मुलांना चुकूनही नदीकिनारी किंवा पाण्यात उतरवू नये’ असे आवाहन श्री. खान यांनी केले आहे. दरम्यान,10 वर्षाच्या स्वर्णीच्या या शौर्याची संपूर्ण चिपळूणमध्ये चर्चा सुरू आहे. Daughter saves mother from crocodile’s jaws

Tags: Daughter saves mother from crocodile's jawsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.