रत्नागिरी, ता. 18 : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना किंवा खराब हवामानात गस्ती नौका समुद्रात पाठवणे धोक्याचे ठरत असल्याने, मत्स्य विभागाने आता पारंपरिक गस्तीबरोबरच ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवण्याचा नाविन्यपूर्ण पर्याय प्रत्यक्षात आणला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रत्नागिरी किनारपट्टीवरील बेकायदेशीर मासेमारी करणार्यांचे धाबे दणाणले असून आतापर्यंत सुमारे १५०० नौकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Action against illegal boats
किनारपट्टीवर सुरक्षा आणि गस्त घालण्यासाठी सागरी नौकांबरोबरच आता ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरुवातीला तीन विशेष ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले होते. हे ड्रोन रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णे या महत्त्वाच्या बंदर परिसरामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. या आधुनिक ड्रोनच्या मदतीने समुद्रात अवैध मासेमारी करणार्या बोटींचा शोध घेतला जात असून, ड्रोनने टिपलेल्या छायाचित्रांच्या व पुराव्यांच्या आधारे आतापर्यंत सुमारे पंधराशे नौकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. Action against illegal boats
या कारवाईदरम्यान नियम मोडणार्या नौकाधारकांकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणखी एक नवीन ड्रोन लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असून, तो जयगड येथे कार्यान्वित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या ड्रोनची मारक क्षमता २४ किलोमीटर लांबीपर्यंत असल्याने, १२ नॉटिकल मॅनपर्यंतच्या सागरी हद्दीत अचूक गस्त घालणे शक्य झाले आहे. Action against illegal boats