• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ ग्रामपंचायतमध्ये माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

by Mayuresh Patnakar
August 17, 2026
in Guhagar
30 0
0
Flag hoisting by ex-soldier
59
SHARES
168
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच गावात तीन दिवस हरघर तिरंगा साजरा करण्यात आला. Flag hoisting by ex-soldier

पहिल्या दोन दिवसांत दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत उमराठ तर्फे विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्व सांगून त्याचे पावित्र्य राखण्याबाबत मार्गदर्शन केले. हरघर तिरंगा मोहिते अंतर्गत उमराठ शाळा नं.१ व शाळा नं.३ मधून गावात देशभक्तिपर घोषणा देत तिरंगा रॅली काढण्यात आली. तसेच एक राखी देशासाठी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थीनी स्वतः तयार केलेल्या राख्या गावचे पोस्टमन दामोदर आंबेकर यांच्या मार्फत जवानांना पाठविण्यात आल्या. Flag hoisting by ex-soldier

Flag hoisting by ex-soldier

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रमुख अतिथी दिपक जालगांवकर व त्यांच्या पत्नी सौ. अर्चना दिपक जालगांवकर यांचा शाळा व ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक सौ. स्नेहल गोरिवले व कु. जानवी यांनी माजी सैनिक दिपक जालगांवकर यांना राखी बांधून सीमेवरील जवानांचे कौतुक केले.  Flag hoisting by ex-soldier

Flag hoisting by ex-soldier

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. सिद्धेश्वर लेंडवे, जि. प. शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक श्री. शशिकांत दाभोळकर सर, उपशिक्षक श्री. सुनिल वाघे सर, अंगणवाडी सेविका सौ.वर्षा पवार, मदतनीस सौ .समृद्धी गोरीवले, आशा सेविका सौ.वर्षा गावणंग व सौ. मैथिली पावसकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, CRP सौ.श्रुती कदम, आरोग्य सेवक श्री.यज्ञेश कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नितीन सावंत, उपाध्यक्ष सौ. योगिता कदम, माजी अध्यक्ष श्री.श्रीकांत कदम, ग्राम. विकास मंडळ अध्यक्ष श्री. प्रकाश पवार, नवलाई देवस्थान अध्यक्ष श्री.अनिल पवार, श्री. नामदेव पवार, खोत वाडी अध्यक्ष श्री. जयेश पवार,श्री. सतीश गुरव, कदम वाडी अध्यक्ष श्री. विनायक कदम, गोरीवले वाडी अध्यक्ष श्री. महेश गोरीवले , तंटामुक्ती अध्यक्ष श्री. कृष्णा गोरीवले, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व महिला मंडळी तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Flag hoisting by ex-soldier

Flag hoisting by ex-soldier

यावेळी उपस्थित  मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थींनी सुद्धा देशभक्तिपर भाषणे केली. तसेच उपस्थित अतिथी माजी सैनिक श्री. दिपक जालगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थी व ग्रामस्थांना भेटवस्तू व खाऊ दिला. यावेळी नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री. नितीन सावंत व कुटूंबीयांकडून तसेच ग्रामपंचायत उमराठ कडून जिलेबी, आरोग्य उपकेंद्र मार्फत खाऊ देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. शशिकांत दाभोळकर तसेच श्री सुनील वाघे  यांनी शाळेतून आमच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांमधून जालगांवकरांसारखे  हिरे घडवून आणण्यासाठी आतापर्यंत तुम्ही सर्व ग्रामस्थांनी जसे सहकार्य केलेत तसेच सहकार्य करत राहावे, अशी विनंती करून व उपस्थित सर्वांचे आभार मानून ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा समारोप केला. Flag hoisting by ex-soldier

Tags: Flag hoisting by ex-soldierGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.