• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सभापती, उपसभापतीच्या यशस्वी शिष्टाईन शृंगारतळीतील उपोषण मागे

by Ganesh Dhanawade
August 17, 2026
in Guhagar
78 1
0
Hunger strike in Shringartali called off
154
SHARES
439
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी मधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढवल्याने आणि शेजारील ओड्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. याप्रकारणी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे दाद मागूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने रहिवाशी महेश दिलीप जाधव हे स्वातंत्रदिनी गुहागर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. Hunger strike in Shringartali called off

पालपेणे फाटा येथील आपल्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसत असल्याच्या समस्येबाबत दि. १५ ऑगस्ट रोजी महेश दिलीप जाधव हे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. दरवर्षी जाधव कुटुंबावर ऐन पावसात मोठी समस्या निर्माण होत होती. घरातील सर्व वस्तू भिजत होत्या. रात्रीच्यावेळी पाणी शिरल्यानंतर भर पावसात जायचं कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे असायचा. याबाबत वेळोवेळी संबंधितांना सांगून व पत्रव्यवहार करून देखील दुर्लक्ष केले गेले. अखेर जाधव कुटुंबाने उपोषण केले. Hunger strike in Shringartali called off

दरम्यान, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना बोलावून घेत त्यांच्या वरिष्ठाशी बोलणं करून घेतले. त्याप्रमाणे  ग्रामपंचायत स्तरावर ज्या कामाची निविदा प्रक्रिया झालेली आहे, ते काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांनी संदर्भीय पत्राद्वारे आपल्या घराजवळ १२०० मि.मी. व्यासाची मोरी टाकण्याचे काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही जाधव यांना कळविले आहे.त्यामुळे सदर समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर व ग्रामपंचायत पाटपन्हाळे यांच्याकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. तशाप्रकारचे पत्र जाधव कुटुंबाला देण्यात आले आहे. Hunger strike in Shringartali called off

यावेळी महेश दिलीप जाधव यांनी माजी सभापती सुरेश सावंत यांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण थांबवले. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, तहसीलदार परीक्षित पाटील, माजी सरपंच संजय पवार, सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रामसेवक सौ. बडद, मनिष कदम, शबीर शेख, रियाज ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते. Hunger strike in Shringartali called off

Tags: GuhagarGuhagar NewsHunger strike in Shringartali called offLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.