गुहागर, ता. 17 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी वाचवल्याची घटना शनिवारी घडली. तांडेल व निहाल तोडणकर यांना अन्य तरुणांनी सहकार्य केले. या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचल्याबद्दल किनाऱ्यावरील सर्वांनी जीव रक्षकांचे कौतुक केले. Rescued drowning in the sea at Guhagar
गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी लावतात. शनिवार रविवारी सुट्टी असल्याने गुहागरात पर्यटकांचा ओघ जास्त असतो. Rescued drowning in the sea at Guhagar
शनिवारी चिपळूण येथील गफार भट व झारखंड येथील हिरालाल करमळी हे दोघे आपल्या अन्य सहा मित्रांसोबत गुहागर फिरायला आले होते. गुहागर पोलीस स्थानकाच्या मागील समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. गफार व हिरालाल या दोघांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोन पुरुष खोल पाण्यात बुडू लागले. आपले मित्र बुडत आहेत, हे कळताच त्याच्या सहकार्यांनी आरडाओरोड केली. याचवेळी किनाऱ्यावरील नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी क्षणाचाही विलंब न घालवता रेस्क्यू बोर्ड घेऊन समुद्रात गेले. या दोघांनीही काही क्षणात बुढणाऱ्या दोघांना किनाऱ्यावर आणले. बुढणाऱ्यांनी प्रदेश व निहालचे बाहेर आल्यावर आभार मानले. Rescued drowning in the sea at Guhagar
