आरजीपीपीएल प्रशासन तीन ग्रामपंचायतींचा थकीत 7 कोटीचा कर केला अदा
गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींचा थकीत असलेला 7 कोटी 1 लाख 20 हजार 727 रुपयांचा कर अदा केला आहे. कंपनीच्या या धोरणामुळे ग्रामपंचायतींनी उगारलेली जप्तीची नामुष्की टळली आहे. Gram Panchayats stay seizure proceedings
गुहागर तालुक्यातील आर जी पी पी एल कंपनीने गेली चार वर्षे आपली सरकारी कंपनी असून आम्ही ग्रामपंचायतीना इमारती व जमीन कर दे लागत नाही अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुहागर पंचायत समिती व नंतर जिल्हा परिषद तिन्ही ठिकाणी सुनावणी घेण्यात येऊन सदर निकाल अंजनवेल वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतच्या बाजूने लागला होता. असे असतानाही आर जी पी पी एल कंपनीने आता मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. कंपनीच्या या आडमुठी धोरणामुळे ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत कायद्यानुसार कर वसुलीसाठी कंपनीवर 28 जुलै रोजी जप्तीची कारवाई करणार करण्याचे जाहीर केले होते. दरम्यान कंपनी प्रशासन या कारवाई पुढे नरमले आणि आम्ही एकूण करा पैकी 50 टक्के कर त्वरित देत आहोत असा प्रस्ताव ठेवून सदर कारवाई स्थगित करावी, अशी विनंती केली होती. यानुसार कंपनीने तब्बल सहा वर्षाच्या एकूण करा पैकी 50 टक्के कर ग्रामपंचायतींना वर्ग केला आहे. Gram Panchayats stay seizure proceedings

गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी ग्रामपंचायतीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. अंजनवेल, वेलदूर व रानवी ग्रामपंचायत च्या सरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी एकजूट होऊन कंपनीच्या कर वसुली बाबतचे घेतलेला धोरणाचा आज विजय झाला आहे. कंपनीवर जप्तीची कारवाई होणार हे प्रसिद्ध झाल्यावर पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून यांचे विचारणा झाली. त्यांच्याजवळ वस्तुस्थिती सांगण्यात आली. मात्र गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींची बैठक घेऊन सदर विषय मार्गी लावावा असा सूचना प्रशासनाला आमच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे कोणतेही इतर लोकप्रतिनिधी व राजकीय हस्तक्षेप न करता गटविकास अधिकारी यांनी तिन्ही ग्रामपंचायतीच्या व कंपनी बरोबर घेतलेल्या बैठकीमधून कर वसुलीचा सकारात्मक तोडगा निघाला आहे. Gram Panchayats stay seizure proceedings

यामध्ये अंजनवेल ग्रामपंचायतींला 4 कोटी 75 लाख 54 हजार 158 रुपये, रानवी ग्रामपंचायतला 1 कोटी 24 लाख 37 हजार 42 रुपये तर वेलदुर ग्रामपंचायतला 1कोटी 1 लाख 29 हजार 527 रुपये कर मिळाला आहे. Gram Panchayats stay seizure proceedings
यावेळी पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी, सारिका दाभोळकर, अंजनवेल ग्रामपंचायत च्या सरपंच सोनाली मोरे, रानवी ग्रामपंचायतच्या सरपंच मनाली कदम आणि वेलदूर ग्रामपंचायतच्या सरपंच दिव्या वनकर, उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, सदस्य यशवंत बाईत, इकबाल पंची, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते. Gram Panchayats stay seizure proceedings
