मनविसेची मागणी; गुहागर गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश प्रदीप रायकर यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर आणि तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच गुहागरचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद शिक्षकांवर लादण्यात आलेले बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) चे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली. Stop the BLO work on teachers
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवर बीएलओसह विविध अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर गंभीर परिणाम होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. Stop the BLO work on teachers
शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनासाठी मुक्त करणे आवश्यक असल्याचे मनविसेने नमूद केले आहे. तसेच, निवडणुकीसंदर्भातील बीएलओची कामे करण्यासाठी इतर विभागातील कर्मचारी किंवा सुशिक्षित बेरोजगार युवकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. Stop the BLO work on teachers
यावेळी प्रथमेश रायकर यांच्यासह मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साटले, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांची भेट घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली. Stop the BLO work on teachers