• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरे भंडारवाडा शाळेमध्ये अनेक विषयांवर मार्गदर्शन

by Mayuresh Patnakar
July 30, 2026
in Guhagar
48 0
0
Education Conference at Aare Bhandarwada School
93
SHARES
267
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरे भंडारवाडा मध्ये शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर शिक्षण परिषदेला माजी सभापतीचे अध्यक्ष सुरेश दादा सावंत, सरपंच समीर घाणेकर, उपसरपंच भोसले मॅडम, मिलिंद सुर्वे, प्रतिष्ठित नागरिक मोरे मॅडम सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. Education Conference at Aare Bhandarwada School

यावेळी मित्र उपक्रम अंतर्गत विपश्यना आनापान कार्यक्रमाविषयी मथुवेल गावित  सर यांनी मार्गदर्शन केले. शाळेमध्ये मित्र उपक्रम आनापान कार्यक्रम दहा मिनिटे दररोज घ्यावयाचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढीस लागणार आहे. तसेच त्यांना अभ्यासाबाबत खूप फायदा होणार आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना पुनर्गठण याविषयी असगोली नं. 2 शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समिती रचनेसाठी विविध निकष शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यपद्धती रचना महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. Education Conference at Aare Bhandarwada School

Education Conference at Aare Bhandarwada School

आंधळे सर यांनी जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम याविषयी माहिती सांगितली. धुमाळ सर यांनी शैक्षणिक समस्या व नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी सविस्तर माहिती विशद केली. सर्व शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेतला. अन्नपूर्णा विद्यालयाचे श्री संजय गमरे यांनी अध्ययन निष्पत्ती वर आधारित नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांनी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. आरे भंडारवाडा शाळेचे मुख्याध्यापक वाघ, शिक्षक देशमुख, माजी मुख्याध्यापिका गणेशकर मॅडम यांनी शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. Education Conference at Aare Bhandarwada School

Tags: Education Conference at Aare Bhandarwada SchoolGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.