• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 July 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी परिक्षेत्रात बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात

by Mayuresh Patnakar
July 27, 2026
in Guhagar
31 1
0
The existence of leopards is in danger.
62
SHARES
176
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू; ७५ बिबट्यांची वनविभागाकडून सुटका

रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी परिक्षेत्रात गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत मानव-वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांत विविध कारणांमुळे एकूण ९० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. तर, वन विभागाने ७५ बिबट्यांची सुखरूप सुटका करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. The existence of leopards is in danger.

डोंगराळ व जंगल भागात वाढती वाहतूक आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वन्य प्राण्यांची वसतिस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. जंगल तोडून मोठमोठी शहरे वसविली जात आहेत. परिणामी सध्या ग्रामीण भागांबरोबरच आता शहराच्या मध्यवर्ती भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. तसेच पाळीव किंवा मोकाट जनावरे ही बिबट्यांना आयते खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. बिबट्याच्या भीतीने फासक्या लावल्या जात आहेत. मात्र, यात अडकून बिबट्यांचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच रस्त्यावरील गाड्यांच्या धक्क्याने आणि जंगलातील त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांची उपासमार होऊ लागल्यानेही बिबट्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. The existence of leopards is in danger.

एकंदरीत रस्ते अपघात, फासक्यात अडकून, उघड्या विहिरीत पडल्याने, उपासमारीमुळे, जखमी झाल्याने, शिकारीत आणि नैसर्गिक अशा विविध कारणांमुळे गेल्या अकरा वर्षात तब्बल ९१ बिबटे मृत झाले आहेत. या अकरा वर्षात फासकीत अडकलेल्या, विहिरीत पडलेल्या तसेच अन्य ठिकाणी अडकलेल्या अशा एकूण ७५ बिबट्यांना वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून वाचवले आहे. २०२० मध्ये सर्वाधिक १८ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर, वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक १६ बिबट्यांची सुखरूप सुटका करून जंगलात सोडण्यात वन विभागाला यश आले आहे. The existence of leopards is in danger.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe existence of leopards is in danger.टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.