• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये ‘महसूल समाधान शिबिर’

by Manoj Bavdhankar
July 24, 2026
in Guhagar
32 0
0
62
SHARES
177
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महसूल व विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

गुहागर, ता. 24 : गुहागर विधानसभा मतदारसंघांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, दि. 29 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री पूजा सेवा मंगल कार्यालय, गुहागर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. ‘Revenue Satisfaction Camp’ in Guhagar

महसूल व इतर शासकीय विभागांच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात अकृषिक रूपांतरण, अधिकार अभिलेख अद्ययावतीकरण, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, विविध शासकीय योजना, सेवा व माहिती याबाबत मार्गदर्शन आणि लाभ देण्यात येणार आहेत. ‘Revenue Satisfaction Camp’ in Guhagar

तसेच महसूल, कृषी, पंचायत समिती, नगरपंचायत, भूमी अभिलेख, आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून विविध दाखले, माहिती व योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. ‘Revenue Satisfaction Camp’ in Guhagar

Tags: 'Revenue Satisfaction Camp' in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.