गुहागर, ता. १४ : असगोली जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रभाग समितीची बैठक उद्या बुधवार, १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत अंजनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. Ward Committee Meeting at Anjanvel
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभाग समिती अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव राहणार आहेत. बैठकीत विविध विभागांतील विकासकामांचा विभागनिहाय आढावा, प्रलंबित कामांवरील चर्चा तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. Ward Committee Meeting at Anjanvel
यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. सरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, लोकप्रतिनिधी तसेच असगोली जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांबाबतच्या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाग समिती अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव यांनी केले आहे. Ward Committee Meeting at Anjanvel
