गुहागर, ता. 09 : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिवराम घाग हे तब्बल 35 वर्षे 2 महिन्यांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेबद्दल रत्नागिरीचे नितीन बगाटे यांच्या हस्ते श्री. घाग यांचा सहपत्नीक सत्कार करून गौरव करण्यात आला. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory
शरद घाग यांनी 1991 मध्ये गुहागर पोलीस स्थानकातून पोलीस सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर संगमेश्वर, चिपळूण, हातखंबा वाहतूक केंद्र, सागरी सुरक्षा विभाग, पोलीस मुख्यालय येथे विविध जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सेवाकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भूमिका बजावली तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग येथील ओरस तसेच रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रभावीपणे काम केले. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory

नागरिकाभिमुख पोलीसिंग, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव या मूल्यांना जपत त्यांनी संपूर्ण सेवाकाळात जनतेचा विश्वास संपादन केला. जिल्हा वाहतूक शाखेतर्फेही श्री. शरद घाग यांना सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला. त्यांच्या निवृत्तीप्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Police Sub-Inspector Sharad Ghag’s glory
