• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 July 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रुग्णालयाच्या पाहणीसाठी राज्याचे आरोग्य संचालक येणार

by Mayuresh Patnakar
July 4, 2026
in Guhagar
74 1
0
Hospital Inspection
145
SHARES
415
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्कर जाधव यांच्याकडून गुहागर मतदारसंघातील ४ रुग्णालयांच्या प्रश्नांचा निपटारा मुंबईत आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

गुहागर, ता. 04 : गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील वावे, चिपळूण तालुक्यातील रामपूर, गुहागर तालुक्यातील आबलोली आणि गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालय या चारही रुग्णालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा निपटारा आ. भास्कर जाधव यांनी राज्याचे आरोग्यमंत्री. प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला. वावे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकाम निधीसाठी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांना प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देऊन पावसाळी अधिवेशन संपताच रामपूर, आबलोलीसह गुहागर रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना या बैठकीत ना. आबिटकर यांनी राज्याच्या आरोग्य संचालकांना केली.  Hospital Inspection

त्यामुळे ही चारही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रेणीवर्धन झालेल्या वावे रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, रामपूर रुग्णालयासाठी उर्वरित जागा मिळेपर्यंत आहे त्या जागेतील इमारतीवर मजला वाढवून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे, आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात यावी आणि गुहागर येथील रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करून सुसज्ज रुग्णालय सुरू करावे या मागण्यांसंदर्भात स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आ. जाधव यांनी आरोग्य मंत्री आबिटकर यांच्याकडे चालू असलेल्या अधिवेशन काळात केली होती. वावे रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनात आलेले अडथळे आणि अडचणी गेली तीन-चार वर्ष संघर्ष करून आपण दूर केल्या. आता श्रेणीवर्धन झाले आहे. रुग्णालय बांधकामासाठी ३१.४९ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादरही झाला आहे. हा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सदर निधीसाठी आम्ही तात्काळ मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवून तो मान्य करून घेतो, असे आश्वासन आबिटकर यांनी दिले आणि हा प्रस्ताव तात्काळ पाठवण्याची सूचना त्यांनी बैठकीतच अधिकाऱ्यांना दिली.  Hospital Inspection

रामपूर आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन झाले असले तरी सध्या आहे ती म्हणजेच ३३ गुंठे जागा पुरेशी नाही. पण त्यासमोरच ४८ गुंठे जागा शासनाच्या मालकीची आहे. ही जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. परंतु, मागणी करूनही प्रत्यक्षात हा ठराव करत नाहीत, अशी कारणे अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर ठराव करून घेऊन जागा शासनाच्या नावावर करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो असे सांगून आ. जाधव यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या आहे त्या इमारतीवर एक मजला वाढवून ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी केली. Hospital Inspection

आबालोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनाचा विषय आला तेव्हा अधिकाऱ्यांनी गुहागर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी निकषाप्रमाणे आवश्यक असलेली जागा नसल्याने हे ग्रामीण रुग्णालय आबलोली येथे स्थलांतरित करावे, असा पर्याय सुचवला. परंतु जाधव यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. गुहागर हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिवाय गुहागर शहर व जवळपास चांगले हॉस्पिटल नाही. त्यामुळे तिथे आहे त्या जागेत बहुमजली इमारत उभी करून सुसज्ज रुग्णालय करावे, अशी मागणी केली. त्याचवेळी आबलोली हे २५ ते ३० गावांचे मध्यवर्ती व बाजारपेठेचे ठिकाण असल्याने खास बाब म्हणून या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मान्यता द्यावी, अशी विनंती आबिटकर यांना केली. Hospital Inspection

Tags: GuhagarGuhagar NewsHospital InspectionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet36
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.