गुहागर, ता. 24 : चिपळूण-खे॑ड येथील विभा अरविंद ग्रंथालय हे नुकतेच पुनरुज्जीवित झालेले ग्रंथालय अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. संचालकांच्या सक्रिय सहभागातून आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल सुरू असून, या कार्यात नुकतीच संस्थापक संचालक श्री.सुहास चव्हाण यांच्या रुपये 11000 ह्या भरीव आर्थिक योगदानामुळे मोलाची भर पडली आहे. Chavan donates to Vibha Aravind Library
श्री. सुहास चव्हाण हे चिपळूण नगरपरिषद येथील निवृत्त बांधकाम अधिकारी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळातही त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, लोकाभिमुख वृत्ती आणि तांत्रिक बाबींवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना भरीव योगदान दिले आहे. चिपळूण-खे॑ड येथील मराठी शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी ते मोठे कार्य करत असून, श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे ही ते सक्रिय संचालक आहेत. Chavan donates to Vibha Aravind Library

चिपळूणमधील प्रसिद्ध साहित्य सेवक श्री.प्रकाश काका देशपांडे यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले विभा अरविंद ग्रंथालय आज सात हजारांहून अधिक पुस्तकांनी समृद्ध झाले आहे. अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांनी ग्रंथालयाला भेट दिली आहे.
वाचन संस्कृती टिकून राहावी, ती वृद्धिंगत व्हावी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. वाचनाबरोबरच हे ग्रंथालय आपलं चिपळूण आणि टच संस्था या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांशी जोडले गेले आहे. या तिन्ही संस्थांच्या समन्वयातून यावर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, साधनांच्या अभावी विद्यार्जन थांबू नये आणि प्रत्येक मूल सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे हा या संस्थांचा प्रमुख हेतू आहे. समाजाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक मदतीचा हात देणाऱ्या या संस्थांना समाजातूनही सहकार्याचे हात पुढे येत आहेत. Chavan donates to Vibha Aravind Library
यावेळी ग्रंथालयाचे माननीय अध्यक्ष श्री.प्रकाशजी काणे, संचालक श्री प्रसाद रिसबूड, संचालक श्री.विकास मेहेंदळे, मार्गदर्शक श्री प्रकाश काका देशपांडे तसेच कार्यवाह श्री. विजय कदम उपस्थित होते. देणगी दिल्याबद्दल सर्व संचालकांनी श्री. सुहास जी चव्हाण यांचे ग्रंथालयाच्या वतीने आभार मानले. Chavan donates to Vibha Aravind Library
