• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगरसेविका विशाखा सोमण यांच्या माध्यमातून NCMC कार्ड कॅम्प

by Mayuresh Patnakar
June 20, 2026
in Guhagar
41 0
0
NCMC camp at Guhagar
80
SHARES
228
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर येथे पुन्हा उद्या NCMC कॅम्पचे आयोजन

गुहागर, ता. 20 : बाजारपेठेतील भारतीय जनता पार्टी च्या नगरसेविका सौ विशाखा सोमण यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी आज कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 44 ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. तसेच  सगळ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उद्या सकाळी 11 वा पुन्हा कॅम्प घेण्यात येणार आहे. NCMC camp at Guhagar

NCMC camp at Guhagar

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC Card NCMC (National Common Mobility Card) सेवेची सुरुवात केली आहे. हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. NCMC camp at Guhagar

NCMC camp at Guhagar

एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.  NCMC camp at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNCMC camp at GuhagarNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.