गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ नं.१ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश व स्वागत उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपसभापती निलेश सुर्वे यांचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्याच शाळेत आज नूतन विद्यार्थ्यांच्या, नियमित विद्यार्थ्यांच्या स्वागतोत्सव समारंभाला सुर्वे हे प्रमुख मान्यवर असल्याने आपल्यासाठी हा भावनिक व अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. Student entrance ceremony at Tavasal

विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिक्षणा, गावच्या विकासाच्या, मुलींच्या प्रगतीच्या घोषणा देत प्रभात फेरीने शाळेमध्ये प्रवेश केला. दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती माता व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या स्वागतोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. तर उपसभापती निलेश सुर्वे यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. पडवे केंद्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ सहित सर्व शाळांच्या सर्वांगीण प्रगती करता यापूर्वी जसे प्रयत्न करत होतो तसेच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न पुढील ५ वर्षाच्या काळात करणार असल्याचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी सांगितले. Student entrance ceremony at Tavasal

यावेळी काताळे ग्रामपंचायत प्रशासक प्रियांका सुर्वे, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी परवेज चिपळूणकर,तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे जेष्ठ व्यक्तिमत्व प्रदीप सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, मुख्याध्यापक खंडगावकर सर, सहशिक्षक राठोड सर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष किरण गडदे, दर्शन सुर्वे,अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, मदतनीस मनीषा मयेकर यांचे बरोबर महिला व पुरुष पालक उपस्थित होते. महिला पालकांची उपस्थित होते. Student entrance ceremony at Tavasal
