• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील २० गावांचा दरडग्रस्त यादीत समावेश

by Guhagar News
May 30, 2026
in Guhagar
250 3
0
Landslide-Affected Villages in Guhagar
492
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तहसीलदारांच्या गाव-वाड्यांना भेटी आपत्ती निवारण केंद्रातर्फे विशेष लक्ष

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील गावांमधील २५ वाड्यांचा दरड प्रवणग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याठिकाणी सूचवलेल्या उपाययोजनांबाबत कार्यवाही झाली, तसेच तेथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन संबधित ठिकाणांना स्थलांतणाबाबत नोटीस देऊन सदर स्थलांतरण काळजीपूर्वक कार्यालयाच्या समन्वयाने करण्याचे आदेश तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिले आहेत. Landslide-Affected Villages in Guhagar

आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे या गावातील वाड्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी २० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांना सदर ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देण्याबाबत कळवण्यात आले आहे.  Landslide-Affected Villages in Guhagar

दरडप्रवण क्षेत्रामध्ये वेलदूरमधील घरटवाडीतर्फे वेलदूर-नवगांव सिद्धेश्वरनगर, नवानगर विठ्ठलवाडी, धोपावेमधील धोपावे-तरीबंदर गुरववाडी, कोळीवाडीतर्फे चाळकेवाडी धोपावे, तेटले, अंजनवेलमधील पेठ अंजनवेल-भोईवाडी, पालशेत आगडीमंदिर, कचिंचबंदरवाडीखाते सावरपाटी, हेदवी-पालशेत तवसाळ रस्ता, परचुरीमधील परचुरी-डाफळेवाडी रस्ता, साखरीत्रिशुळमधील मोहल्ला म्हसकरवाडी रस्ता, पेवे गावातील सुतारवाडी रस्ता, कारुळमधील भूस्खलन वाड्यांमधील जांभळेवाडी, हुंबरेवाडी, गुरववाडी, जोशीवाडी, वडद गावातील वडद बौद्धवाडी, वडद, कुडलीमधील कुडली-रेवसाबंदर रस्ता, तरीबंदर अबिरे रस्ता, आंबरेखुर्द गावातील ब्राह्मणवाडी रस्ता, आंबेरे-पाचेरी आंबेरे रस्ता, आंबेरेवाडी, पाचेरीआगर गावातील काजोळकरवाडी रस्ता, कोंडवाडी, भातगावमधील भातगांव मासू आंबेरे, असोरे, भातगाव रस्ता, काजुर्लीमधील काजुर्ली कुभारमळा, आवरे-असोरे गावातील असोरे घाटी, शिर गावातील महालक्ष्मी रस्ता, भातगाव तिसंग गावातील भातगाव तिसंग कोसबीवाडी सुवरेवाडी, पाचेरी सडा गावातील बौद्धवाडी या ठिकाणांचा समावेश आहे. Landslide-Affected Villages in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLandslide-Affected Villages in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share197SendTweet123
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.