गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नवानगर रोहीलकरवाडी येथे श्री राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शुक्रवार दिनांक 20 मार्च ते गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी मित्रमंडळींसह सहभागी व्हावे व सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री राम मंडळ रोहीलकरवाडी यांच्याकडून करण्यात आली आहे. Shri Ram Janmotsav at Nawanagar

श्री राम नवमी जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 23 व बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 5.15 ते 6.15 वाजता काकड आरती व संपूर्ण दिवसभर श्रीराम विजय ग्रंथ पारायण करण्यात येणार आहे. सायं. 7 वाजता आरती व भजन
मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी रात्री 10 वाजता श्रीराम नाट्य मंडळ नवानगर रोहीरकरवाडी यांचे तीन अंकी नाटक “संगीत सौभद्र” सादर करण्यात आहे. त तीन गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी 5.30 ते 6.30 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 12.30 वाजता श्रीराम विजय ग्रंथ पारायण, दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा, दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 ते सायं. 6 वाजता श्री प्रभू रामचंद्रांच्या पालखीची गावातून मिरवणूक, सायंकाळी 6.30 वाजता आरती व रात्री 9 वाजता श्री राम ग्रामस्थ मंडळ रोहीलकरवाडी संगीत “रामलीला” सादर करणार आहेत. Shri Ram Janmotsav at Nawanagar
