• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूरमध्ये पेटत्या होमातून धावणार संकासुर

by Manoj Bavdhankar
February 25, 2026
in Guhagar
129 2
0
Holi festival of Adur Sunkai Devi
254
SHARES
725
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २६ व २७ फेब्रुवारी रोजी सुंकाई मातेचा मुख्य होलिकोत्सव

गुहागर, ता. 25 : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील अडूर ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचा वार्षिक होलिकोत्सव दि. २२ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उत्सवातील सर्वात आकर्षणाचा आणि थरारक भाग म्हणजे पेटत्या होमातून धावत भक्तांचा पाठलाग करणारा संकासुर. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी जिल्हा तसेच परजिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. Holi festival of Adur Sunkai Devi

Holi festival of Adur Sunkai Devi

ग्रामदेवतेची पहिली होळी फाल्गुन पंचमीला प्रज्वलित होते. त्यादिवशी देवीच्या खेळ्यांची भोवनी चतु:सीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांत पार पडते. निवडक भोवनीचे खेळे झाल्यानंतर फाल्गुन दशमी (दि. २६ फेब्रुवारी) रोजी पाचवी होळी तर फाल्गुन एकादशी (दि. २७ फेब्रुवारी) रोजी सहावी होळी साजरी केली जाणार आहे. या दोन्ही दिवशी नवीन व जुनी गावकी नमन मंडळांच्या सादरीकरणासह सायंकाळी भाटी मैदानावर पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार अनुभवायला मिळणार आहे. फाल्गुन त्रयोदशीला भोवनीच्या खेळ्यांची सांगता होईल, तर फाल्गुन चतुर्दशीला होळी सणाच्या दिवशी ग्रामदेवता सुंकाई देवीची रूपे लावण्याचा कार्यक्रम पार पडेल. Holi festival of Adur Sunkai Devi

Holi festival of Adur Sunkai Devi

फाल्गुन पौर्णिमा, म्हणजेच धुलीवंदन दिवशी मुख्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी ग्रामदेवता सुंकाई मातेची पालखी मंदिरातून सहाणेकडे आणण्यात येईल. वारकरी भजनाच्या गजरात माडहोळी घेऊन देवीच्या होमाभोवती पाच प्रदक्षिणा घालून होमाला अग्नी दिला जाईल. त्यानंतर सुंकाई देवी व पावणाई देवी यांच्या होमाभोवती वाजत–गाजत मिरवणूक काढून पालखी सहाणेमध्ये स्थानबद्ध केली जाईल आणि महाआरती होईल. याच दिवशी दुपारी अडूर, कारूळ, बोऱ्या व बुधल या गावांच्या चतु:सीमेची बैठक आयोजित करून ग्रामदेवतेची पालखी घरोघरी भोवणीसाठी नेण्याचे नियोजन केले जाईल. रात्री १० वाजता सुंकाई देवी ग्रामस्थ मंडळ, अडूर यांच्या वतीने बहुरंगी नमन कलेचे सादरीकरण होणार आहे. Holi festival of Adur Sunkai Devi

धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी धुळवट साजरी करण्यात येईल. यावेळी ग्रामदेवता सुंकाईसह विविध देवस्थानांना मानकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून प्रसाद व खजूर वाटप केले जाईल. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी मराठा समाज व श्री पड्याळ देवाच्या मानाच्या स्थानी नेऊन गाऱ्हाणे घालण्यात येईल. पुढील दिवसांपासून पालखी घरोघरी भोवणीसाठी नेली जाईल. Holi festival of Adur Sunkai Devi

Tags: GuhagarGuhagar NewsHoli festival of Adur Sunkai DeviLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.