माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरीतर्फे आयोजन
गुहागर, ता. 10 : लोकमत न्यूज नेटवर्क शृंगारतळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेने तालुका स्तरावर सुयश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त दुर्वा दशरथ नाटेकर ( प्राथमिक गट ) व कु आर्या गणेश झगडे ( माध्यमिक गट ), तसेच सहभागी विद्यार्थिनी गार्गी अमोल क्षीरसागर यांना गट शिक्षणाधिकारी एम .गळवे शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. Guhagar High School’s success in oratory competition

यावेळी पर्यवेक्षक मधुकर गंगावणे , मराठी विभाग प्रमुख पी. बी .जाधव , स्वामिनी भोसले , एस एस ठाकूर, मनीषा सावंत , कृपाल परचुरे, उत्कर्ष तांबट उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. Guhagar High School’s success in oratory competition
