समाजाच्या विविध विषयांवर चर्चा
गुहागर, ता. 10 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत पाटपन्हाळे (श्रृंगारतळी) येथे संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांच्या उपस्थितीत पार पडली. Annual meeting of Guhagar Teli Samaj Sangh
सभेच्या प्रास्ताविकामध्ये सचिव प्रवीण प्रकाश रहाटे यांनी सन २०२४/२०२५ या वर्षामध्ये बेसिक, महिला व युवक समितीने केलेल्या अनेक समाजोपयोगी कामकाजाची माहिती सभागृहात दिली. तेली वधु वर डॉट कॉम सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक युवक युवती नोंदणी करत असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील पाच गटातील गटप्रमुख व उपगटप्रमुख तसेच गाव प्रमुख यांच्या उपस्थितीबाबत माहिती देण्यात आली. या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०२४-२५ च्या झालेल्या जमा खर्चाचे वाचन करण्यात आले. सन २०२५/२५ आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. आजीवन सभासद व सभासद नोंदणी जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी करावी, असे आवाहन करण्यात आले. Annual meeting of Guhagar Teli Samaj Sangh


गाव भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचा व त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा तालुका कार्यकारणी प्रयत्न करत आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये युवक जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या समीर महाडिक, गुहागर तालुका महिला समिती तालुका अध्यक्ष पदी निवड झालेल्या दिव्या दीपक किर्वे, गुहागर तालुका युवक समिती अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रशांत प्रभाकर रहाटे यांचा तसेच गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेल्या गजानन उर्फ दिलीप वसंत जाधव यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Annual meeting of Guhagar Teli Samaj Sangh
या सभेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागरचे उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव प्रवीण प्रकाश रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, महिला समिती अध्यक्ष दिव्या किर्वे, युवक समिती अध्यक्ष प्रशांत रहाटे, युवक जिल्हाध्यक्ष समीर महाडिक, संदीप राऊत, प्रा.संदीप महाडिक, अस्मिता झगडे, रोहिणी रहाटे, प्राची पवार यांच्यासह तेली समाज बांधव बहुसंख्य उपस्थित होते. Annual meeting of Guhagar Teli Samaj Sangh