• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देशात दोन टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना

by Guhagar News
June 5, 2025
in Bharat
65 1
0
Caste-wise census in the country
128
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१ ऑक्टोबर २०२६ पासून पहिल्या टप्प्याला होणार सुरुवात

नवीदिल्ली, ता. 05 : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. विरोधीपक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर केली आहे. Caste-wise census in the country

भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ मार्च २०२७ पासून देशाच्या उर्वरीत भागात सुरू होईल. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. देशात या अगोदरची जनजगणना काँग्रेस सरकार असताना झाली होती. सन 2011 मध्ये देशात जनगणना झाली, त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, देशभरात कोरोनाची महामारी असल्याने 2021 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे, आता 2027 पासून जनगणनेला सुरुवात होत असल्याने तब्बल 16 वर्षांनी जनगणना होत आहे. Caste-wise census in the country

दरम्यान, जनगणना दर 10 वर्षांनी घेतली जावी, अशी कायदेशीर तरतूद आहे. मात्र, केंद्र सरकारने नुकतेच जनगणना घेण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामध्ये, जातनिहाय जनगणना घेण्यात येणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले होते.  देशात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. Caste-wise census in the country

Tags: Caste-wise census in the countryGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.