संबंधितांकडून कोणतीच डागडुजी नाही, संरक्षक भिंत कोसळली
गुहागर, ता. 24 : तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडले. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे होणाऱ्या नुकसानी बाबत योग्य दाखल न घेतली गेल्याने सुरु असलेल्या अवकाळी पावसाने रस्ते धोकादायक बनले आहेत. Underground power line works make roads dangerous


शहरातील खालचापाट येथील रस्त्याशेजारील संरक्षक भिंत कोसळली आहे. तसेच तालुक्यातील अनेक मार्गावर खोदकाम करण्यात आलेला भराव वाहून रस्त्यावर पसरला असून रस्ता चिखलमय बनला आहे. समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या कामातून अनेक वाद निर्माण झाले. रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गटारात टाकलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते. Underground power line works make roads dangerous


शहरातील खालचापाट येथे वाहळाच्या बाजूला खूप जुनी संरक्षक बांधी बांधली गेली आहे. पावसाळ्यात या वाहळामध्ये तुडुंब पाणी वाहत असत. जेव्हा सदरील भूमिगत लाईन टाकण्यासाठी आले तेव्हा या संरक्षक भिंतीच्या बाजूने खोदकाम करू नका असे सांगण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. खोदकाम केल्याने संपूर्ण बांधीचे दगड सरकून बांधी धोकादायक बनली. गेले पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे बांधी कोसळली असून वाहन चालकांना वाहने घेऊन जाणे धोक्याचे झाले आहे. Underground power line works make roads dangerous